माणसाला प्रत्येक टप्प्यावर कुणाची न कुणाची मदत नक्कीच होत असते.आपल्याकडे मात्र त्या मदतीकडे बघण्याची डोळस दृष्टी हवी .साधी गोष्ट पहा न तुम्ही शाळेच्या बस साठी उभी असणारी मुळे पहा.बस आल्यानंतर लहान मुळे आधी चढतात ,मोठी नंतर चढतात.कोण शिकवत यांना अस ,कोणीच नाही.काढो कधी या लहानांचे डब्बे ,हातातल्या पिशव्या सुद्धा या मोठ्या मुलांकडून घेतल्या जातात आणि लहानांना मदत केली जाते.
Astitva
Thursday, 30 June 2022
Wednesday, 23 January 2019
प्रत्येकाच्या मनात खूप कोपरे रिकामे असतात .जो तो भोवतालच्या असलेल्या माणसांनी त्या रिकाम्या जागा भरून काढायचा प्रयत्न करतो. तो त्यात कधी यशस्वी होतो तर कधी अपयशी. कधी कुढत जगतो तर कधी त्यावर मात करून जगतो.. अमुक माणूस आयुष्यात असता तर काय झालं असत तमुक माणूस असता आयुष्यात तर काय झालं असत असं त्याला सारखं वाटत राहत. तो एकांतामध्ये कधी कधी स्वतःला ठेवतो.प्रश्नांची उत्तर शोधतो.काही सापडतात तर काही सापडत नाहीत. जगण खरंतर सोपं असत, कधी ते अवघड भासत. त्याला जेव्हा एकाकीपणावर मात करायला जमते तेव्हा त्याला आयुष्य सोपं वाटत तर जेव्हा खचतो तेव्हा त्याला खूप अवघड हे असं वाटत . अनेक प्रसंग त्याची परीक्षा घेतात ..तो संघर्ष करतो यश मिळवतो. तर यश कधीतरी हुलकावणी देत अनपेक्षितपणे.. नियतीचा डाव म्हणून मग अशावेळी आपण शांत बसतो.पण खचून न जात त्यावर मात करण फार महत्वाचं असत ..नियती आपण न केलेल्या अनेक चुकांची शिक्षा अतिशय सढळ हाताने आपल्याला देते.. त्याचे चटके अगदी भयंकर असतात..आपण त्यात होरपळतो आतून..पण बाहेर त्याचा लवलेश न दाखवणं हि कला असते ..आणि ज्याला जगायचंय त्यालाच ती साधते
Thursday, 10 November 2016
Ladhai Astitvachi!!!
आज अस्तित्व प्रतिष्ठानच्या प्रकल्पाला भेट देण्याचा योग्य आला. वीर गावामध्ये(तालुका पुरंदर,जिल्हा पुणे )अतिशय दुर्गम अशा भागात संतोष वाघ नावाची एक तडफदार व्यक्ती आश्रमशाळा अतिशय शिस्तबद्धपणे चालवते हे पाहून खरंच कौतुक आणि आनंद वाटला. पुण्यातून हडपसर सासवड ते वीर असा आमचा प्रवास संतोष सरांमुळे सुखद झाला. पुरंदर च्या पायथ्याशी छोट्याशा गावात मुलांसाठी संतोष वाघ ही आश्रमशाळा चालवतात.
या शाळेत एकूण ५८ मुले आहेत.निवासी ३ शिक्षक आणि जेवण बनवणाऱ्या ३ मावशी आहेत. साधारणतः २००३ पासून या आश्रम शाळेचे काम सुरु आहे. या शाळेच्या मंडळात गीतांजली देगावकर मॅडम आहेत. शाळा स्वयंअर्थ साहाय्यावर सध्या चालू आहे. ५८ मुलांची राहण्याची,जेवणाची संपूर्ण जबाबदारी प्रतिष्ठान ने उचलली आहे. या मुलांचे पालक हे विविध स्तरातील आहेत. एकच पालक असणाऱ्या मुलाची संख्या याठिकाणी जास्त आहे.तर काही मुलांना आई वडील नाहीत,त्यांना मामा,काका अशा नातेवाईकांनी शिक्षणासाठी येथे आणून सोडले आहे. शाळेत मुलांनी स्वावलंबी आयुष्य कसे जगावे याचे शिक्षण दिले जाते.

Subscribe to:
Posts (Atom)