Wednesday, 23 January 2019

प्रत्येकाच्या मनात खूप कोपरे रिकामे  असतात .जो तो भोवतालच्या असलेल्या माणसांनी त्या रिकाम्या जागा  भरून काढायचा प्रयत्न करतो. तो त्यात कधी  यशस्वी होतो तर कधी अपयशी. कधी कुढत जगतो तर कधी त्यावर मात करून जगतो.. अमुक माणूस आयुष्यात असता तर काय झालं असत तमुक माणूस असता आयुष्यात तर काय झालं असत असं त्याला सारखं वाटत राहत. तो एकांतामध्ये कधी कधी स्वतःला ठेवतो.प्रश्नांची उत्तर शोधतो.काही सापडतात तर काही सापडत नाहीत. जगण  खरंतर सोपं असत,  कधी ते अवघड भासत. त्याला जेव्हा  एकाकीपणावर मात करायला जमते तेव्हा  त्याला आयुष्य सोपं वाटत तर जेव्हा खचतो तेव्हा त्याला खूप अवघड हे असं वाटत . अनेक प्रसंग त्याची परीक्षा घेतात ..तो संघर्ष करतो यश मिळवतो. तर यश कधीतरी हुलकावणी देत अनपेक्षितपणे.. नियतीचा  डाव म्हणून मग अशावेळी आपण शांत बसतो.पण खचून न जात त्यावर मात करण फार महत्वाचं असत ..नियती आपण न केलेल्या अनेक चुकांची शिक्षा अतिशय सढळ हाताने आपल्याला देते.. त्याचे चटके अगदी भयंकर असतात..आपण त्यात होरपळतो आतून..पण बाहेर त्याचा लवलेश न दाखवणं हि कला असते ..आणि ज्याला जगायचंय त्यालाच ती साधते