आज अस्तित्व प्रतिष्ठानच्या प्रकल्पाला भेट देण्याचा योग्य आला. वीर गावामध्ये(तालुका पुरंदर,जिल्हा पुणे )अतिशय दुर्गम अशा भागात संतोष वाघ नावाची एक तडफदार व्यक्ती आश्रमशाळा अतिशय शिस्तबद्धपणे चालवते हे पाहून खरंच कौतुक आणि आनंद वाटला. पुण्यातून हडपसर सासवड ते वीर असा आमचा प्रवास संतोष सरांमुळे सुखद झाला. पुरंदर च्या पायथ्याशी छोट्याशा गावात मुलांसाठी संतोष वाघ ही आश्रमशाळा चालवतात.
या शाळेत एकूण ५८ मुले आहेत.निवासी ३ शिक्षक आणि जेवण बनवणाऱ्या ३ मावशी आहेत. साधारणतः २००३ पासून या आश्रम शाळेचे काम सुरु आहे. या शाळेच्या मंडळात गीतांजली देगावकर मॅडम आहेत. शाळा स्वयंअर्थ साहाय्यावर सध्या चालू आहे. ५८ मुलांची राहण्याची,जेवणाची संपूर्ण जबाबदारी प्रतिष्ठान ने उचलली आहे. या मुलांचे पालक हे विविध स्तरातील आहेत. एकच पालक असणाऱ्या मुलाची संख्या याठिकाणी जास्त आहे.तर काही मुलांना आई वडील नाहीत,त्यांना मामा,काका अशा नातेवाईकांनी शिक्षणासाठी येथे आणून सोडले आहे. शाळेत मुलांनी स्वावलंबी आयुष्य कसे जगावे याचे शिक्षण दिले जाते.

आज संतोष वाघ सर नाहीत याचे वाईट वाटते .
ReplyDelete